उपवर्गीकरण विरोधी महामोर्चास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
गंगाखेड येथे उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा निमित्त तालुक्यातील मौ. धारासूर येथे २६ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बैठकीस सुरुवात झाली दरम्यान समाजाच्या हक्क आणि आरक्षण संरक्षणासाठी गंगाखेड येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा सरसेनानी आद. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला असून या संदर्भात धारासूर येथे महत्व पूर्ण बैठक पार पडली बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. मा. मिलिंद क्षीरसागर यांनी कायद्याच्या दृष्टीकोनातून उप वर्गीकरणाचे दुष्परिणाम समजावून सांगितले यावेळी नगरसेवक मा. प्रविण घोबळे, पंचायत समिती सदस्य मा. श्रीकांत गायकवाड यांनी समाजाने एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी धारासूर ग्रामपंचायतचे सरपंच राजेभाऊ गवळे यांच्या सह गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामोर्चात धारासूर व परिसरातून हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.





















