दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
तालुक्यातील वझूर खु. व वझूर बु. येथील शेतकऱ्यांचे गाय गोठा, सिंचन विहीर व कुशल कामांचे थकीत बिल तत्काळ मंजूर करावे, या मागणीसाठी ०७ ऑक्टोबर पासून मानवत पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी सुरू केलेले उपोषण जिल्हा परिषद सदस्य दत्तराव जाधव भोसेकर यांच्या मध्यस्थीने अखेर मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासून बिले प्रलंबित असल्याने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांनी मानवत पंचायत समितीसमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. या उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य दत्तराव जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचायत समिती प्रशासनाशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या मागण्या रास्त असून लवकरच थकीत बिले मंजूर करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पंचायत समिती सभापती विष्णू होंडे, उपसभापती सुरज काकडे, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, मुकुंद मगर, तुकाराम चव्हाण, पांडुरंग शिंदे, सुरेश नारायण चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, सुरेश भिमराव चव्हाण, ज्ञानोबा चव्हाण, दत्तराव चव्हाण, शंकर चव्हाण, परसराम चव्हाण, बालासाहेब बलांडे, ज्ञानोबा शिंदे, भारत बन्सिधर चव्हाण, बळीराम शिंदे, मारोती शिंदे, भारत मदन चव्हाण, सुनील चव्हाण, संतोष शिंदे, सय्यद अंबिर, सुरेश वाघमारे व वझूर येथील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.






















