दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत तालुक्यातील मगर सावंगी येथे २८ सप्टेंबर रोजी शिवसेना उ. बा. ठा गटाच्या वतीने शासनाच्या फसव्या जी आरची होळी करण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांसाठी काढलेला जी आर हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा असून हा फसवा जीआर आहे, असा आरोप यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेशराव मगर यांनी शासनाच्या खोट्या जीआरचा निषेध व्यक्त करून जीआरची होळी केली. भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी जो जीआर काढला आहे, तो शेतकऱ्यांच्या हिताचा नसून केवळ दिखावा आहे. या फसव्या जी आरचा निषेध म्हणून शेतकरी व शिवसेनेच्या वतीने जीआरची होळी करण्यात आली. यावेळी शिवसेना उ. बा. ठा गटाचे उपतालुका प्रमुख गणेशराव मगर यांच्या सह गावातील शेतकरी रावण आप्पा मगर, नामदेवराव मगर, मुंजाभाऊ मगर, विलासराव मगर, राजेभाऊ मगर, गोरख मगर, बाबासाहेब मगर, विठ्ठलराव मुटकुळे, सुभाष मगर, नारायण मगर, मगनाथ मगर, महादेव मगर, सिद्धेश्वर मगर, भगवानराव मगर, बापू मगर, प्रभाकर मगर, रामभाऊ मगर, बालासाहेब मगर, बबन मगर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























