दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळात मोठ्या जिकिरीने ऊस पीक जपले आहे. स्वतःच्या पोटापेक्षा काळजी घेऊन जपले वाढवले आहे, त्याच्या या कष्टाला साखर कारखान्याकडून नेहमीच अवहेलना करण्यात आली आहे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सहन करणार नाही, असा इशारा देणारे निवेदन योगेश्वरी शुगर इ.प्रा.लि. लक्ष्मीनगर, लिंबा ता. पाथरी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तसेच देश्यातील वाढलेले साखरेचे दर पाहता या वर्षी उसाचा दर सुद्धा त्याच पद्धतीने वाढायला हवे. जो पर्यंत २०२६-२७ हंगामात भाव ठरवल्या जात नाही तो पर्यंत कारखाना सुरू करण्यात येऊ नये अन्यथा कारखाना व शेतकऱ्यांच्या संघर्ष अटळ आहे, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना पाथरी तालुकाध्यक्ष किशोर शिंदे, मानवत तालुकाध्यक्ष विठ्ठल चोखट नामदेव काळे, रंजीत चव्हाण, दत्ता परांडे, उत्तम जोगदंड, कारभारी जोगदंड, संतोष जोगदंड, ऋषी जोगदंड, दादासाहेब पाते, दशरथ थिटे, सुरेश महिफाल, अली भाई, संजय कुलकर्णी डोंगरे, बाबुराव जोगदंड, सुधाकर जोगदंड, श्याम निर्मळ, संदीप निकम, यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























