दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
०५ सप्टेंबर रोजी मानवत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरळद येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते विद्येचा जननी माता सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे केली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक विलास मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचे समाजातील स्थान आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक विलास मोरे, संतोष शिंदे, अक्षय राऊत, प्रविण कदम, बालासाहेब पाते यांच्या सह महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रंणजित भैया तुपसमुद्रे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदू जयस्वाल, आशा वर्कर साधनाताई तुपसमुद्रे, योगेश फंड, चैतन्य फंड, मुंजाभाऊ रोकडे, अविनाश लोहाळे, प्रल्हाद तिथे, बालाजी खंडागळे, प्रल्हाद वैद्य, सिद्धेश्वर बारहाते, विशाल बारहाते, सोमेश्वर बोबडे यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















