विहिरीत मुबलक पाणीसाठा असतानाही पाणी सोडण्यास टाळाटाळ; ग्रामस्थांची गट विकास अधिकाऱ्यांकडे धाव
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत तालुक्यातील मौजे सावळी गावातील दलित वस्तीला सरकारी विहिरीवरील पाईप लाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र धक्कादायक बाब म्हणजे विहिरीत पाणीसाठा मुबलक असतानाही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे.धरण उषाला कोरड घशाला असा प्रकार झाल्याचे चित्र सद्या पाहवयास मिळत आहे येथील गेल्या एक ते दीड महिन्यापासून दलित वस्तीचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प असल्याने येथील महिला, लहान मुले व वृद्धांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या बाबत ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कडे विचारणा केली असता “लाईट नाही, फॉल्ट आहे” अशी मोघम व उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. तर सरपंच तथा प्रशासक व ग्रामविकास अधिकारी सांगतो पाहतो आज होईल उद्या होईल अशी खोटी आश्वासने देऊन ग्रामस्थांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आहे. या विरोधात ग्रामस्थांनी आक्रम पवित्रा घेत गट विकास अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली असून यात मागण्या करण्यात आल्या आहेत, मुबलक पाणी असतानाही होणारी टाळाटाळ थांबवून तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा, तांत्रिक बाब पूर्ण होत नाही तो पर्यंत दलित वस्तीला टँकरद्वारे पाणी पुरवठा द्यावा, आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली असून दरम्यान पाणी पुरवठ्या बाबत उपाययोजना न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला असून निवेदनावर बाळासाहेब तूपसमिंद्रे, कृष्णा वैराळ, नितीन वाव्हळे, दिपक तूपसमिंद्रे, उत्तम जमधडे, रामेश्वर घागरे, धोंडीराम राक्षे, हरिभाऊ पंडीत, बाबू आवचार, विलास वाव्हळे, परमेश्वर घागरे, सटवाजी वाव्हळे, आश्रोबा घागरे, रमेश घागरे, प्रकाश तूपसमिंद्रे, किसन वाव्हळे, ज्योती वैराळ, जमूनबाई वैराळ, शरद कांबळे, विमलबाई ढवळे, वच्छलाबाई वाव्हळे, प्रयागबाई खरात यांच्या सह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





















