दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
सावरगाव खु. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. सावरगाव खुर्द संचालक मंडळ निवडणूक २०२६-२०३१ मध्ये परिवर्तन शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. १३ पैकी १० जागांवर विजय मिळवत रयत क्रांती संघटनेचा झेंडा दिमाखात फडकला आहे. रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा. परमेश्वर नाना घाटूळ यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलने ही निवडणूक लढवली होती. परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे अधिकृत विजयी उमेदवार – परमेश्वर नाना घाटूळ, सखाराम रमजी टरपले, साहेबराव शेषेराव घाटूळ, माणिकराव संभाजी गव्हाणे, कृष्णा भगवानराव जाधव, बालाजी बापूराव जाधव, दत्तराव रामभाऊ घाटूळ, राजाराम सिताराम घाटूळ, बाबासाहेब रामप्रसाद सातव, रामभाऊ नारायणराव घाटूळ, सावित्राबाई ज्ञानोबा जाधव, माणिक विठ्ठल सौदागर, कलावंती तुकाराम डाके यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हा विजय केवळ एका सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा विजय नसून, सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी एकजुटीने दाखवलेल्या लोकशाहीच्या सामर्थ्याचा विजय आहे, असे यावेळी परमेश्वर घाटूळ यांनी सांगितले. या विजयासाठी मतदार बंधू – भगिनींचे, हितचिंत कांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार त्यांनी मानले.























