दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत तालुक्यातील वझूर खु. येथील आम्रपाली बुद्ध विहारात दि. २६ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमे निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बौद्ध उपासकांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले. उपासक प्रल्हाद दगडूबा शेळके यांच्या कडून खीर दान करण्यात आले. याप्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि राष्ट्रनिर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीप, धूप, पुष्पाने पूजन करून अभिवादन करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन सुरू असून आज वाचनाला दोन महिने पूर्ण झाले. या कार्य क्रमास सर्व बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.विहारात अत्यंत मंगलमय वातावरणात कार्यक्रम पार पडला यावेळी उपासक उपासिका व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.























