दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधि मानवत
मानवत येथील ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी गणेशोत्सवा निमित्त विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले यात इयत्ता ५ वी ते ८ वी गटासाठी घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत आयुष सिद्धार्थ हजारे (इ. ६ वी) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने लिहिलेल्या निबंधाला परीक्षकांनी सर्वाधिक गुण दिले. निबंध लेखन स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम आयुष सिद्धार्थ हजारे – इ. ६ वी द्वितीय आर्या गोपाल पल्लोड – इ. ८ वी तृतीय – आस्था मुंजाभाऊ शिंदे इ. ७ वी उत्तेजनार्थ ईश्वरी गजानन वगरे इ. ५ वी तसेच चित्रकला स्पर्धेत हर्षदा अतुल केंधळे (६ वी) प्रथम, प्रांजली विश्वनाथ माने (८ वी) द्वितीय, प्राप्ती प्रदीप अंभोरे (७ वी) तृतीय तर दाजीबा आंतोबा माने (५ वी) याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. आज झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा क्लास संचालकांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला, तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आयुषच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.























