अध्यक्षपदी रंजित भैया तुपसमुंद्रे तर उपाध्यक्षपदी संदीप वैद्य यांची निवड
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मानवत तालुक्यातील मौ. नरळद ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान अंतर्गत समितीची स्थापना करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली महत्व पूर्ण बैठक आयोजित करण्यात आले होती यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आली. गावातील किरकोळ वाद – विवाद गावातच आपसी चर्चा आणि सलोख्याने सोडवणे, गावात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच शासकीय योजनांची माहिती जनते पर्यंत पोहोचवणे हा या समितीचा प्रमुख उद्देश आहे. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष सर्वानुमते श्री. रंजित विठ्ठलराव तुपसमुंद्रे तर उपाध्यक्षपदी श्री. संदीप शिवदास वैद्य, सचिवपदी श्री. मुंजाभाऊ कचरुबा तुपसमुंद्रे, श्री. नागूराम नारायण रोकडे, श्री. मारोती लक्ष्मण पवार, श्री. शेख बाबु शेख मिया, श्री. गणेश मयंकराव फंड, श्री. माणिक दत्ताराव कापरे, सौ. अनिता दत्तात्र्यय रोकडे, सौ. वर्षा विठ्ठल तुपसमुंद्रे, सौ. इंदुबाई गजानन मुजमुले, सौ. पुष्पाबाई प्रकाशराव फंड, सौ. राधा लक्ष्मण धनले, सौ. प्रियंका प्रभाकर बारहाते, ग्रामपंचायत अधिकारी श्री. एन. डी. मोरे, मुख्याध्यापक श्री. व्ही. एल. मोरे, ग्राम महसुल अधिकारी श्री. ए. पी. मस्के यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या तर नवीन समितीने गावाला तंटामुक्त गाव बनवण्यासाठी सर्व नागरिकांच्या सहकार्याने काम करण्याचा संकल्प केला आहे. समितीच्या स्थापनेमुळे नरळद गावाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्याचे अभिनंदन करण्यात आले.





















