दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी, जि. जालना येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा ०५ वा दिवस असून शासन या गंभीर प्रश्नाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसें दिवस खालावत चालल्याने मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच अनुषंगाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज, मानवत तालुका यांच्या वतीने उद्या ०३ सप्टेंबर गुरुवार रोजी मानवत तालुका शांततेत कडकडीत बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे. या बंद संदर्भात आज सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. हा बंद शांततेच्या मार्गाने पाळण्यात येणार असून सर्व व्यापारी, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समाज मानवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.





















