दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मानवतच्या वतीने धम्म रथ संदेश यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी शनिवारी सकाळी ९:३० वाजता नालंदा बुद्ध विहार, शाहूनगर मानवत येथे संघ भूमी बीड ते दीक्षाभूमी नागपूर अशी जाणारी धम्म रथ संदेश यात्रा दाखल झाली. या यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक भदंत डॉ. सुमेधजी बोधी आणि भिक्खू संघाचे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहरातील बौद्ध उपासक – उपासिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सीताराम अंभुरे यांच्या कडून यात्रेतील भिक्खू संघाला फळे देण्यात आली व चहा – बिस्कीट अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तथा जिल्हा सरचिटणीस के.वाय. दवंडे, तालुका अध्यक्ष नामदेव आठवणे, तालुका सर चिटणीस नाथा भदर्गे, कोषाध्यक्ष अशोक भदर्गे, संस्कार उपाध्यक्ष राजेभाऊ गायकवाड, कार्यालयीन सचिव भीमा कसारे, संरक्षण सचिव सुनील ढगे, संघटक सीताराम अंभोरे, तुकाराम बोराडे, विलास तुपसमुंद्रे, बि. के. साळवे, भारिप बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष धम्मपाल सोनटक्के, फकीरा सोनवणे, साधूजी खरात, ग्रंथवाचक खरातताई, कांबळे ताई यांच्या सह बौद्ध उपासक, उपासिका व बालक – बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.























