दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
०५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत येथे परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती माननीय सौ. वैशालीताई पंकजराव आंबेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील सर्व शिक्षकवृंदांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास माननीय श्री. सुनील कुमार तोष्णीवाल गटशिक्षणाधिकारी मानवत, माननीय श्री. सुरज काकडे पाटील उपसभापती पंचायत समिती मानवत, माननीय श्री. पृथ्वीराज धर्मे केंद्रप्रमुख मानवत यांच्या उपस्थितीत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. माणिक घाटूळ यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख मांडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांची भूमिका आता केवळ शिक्षक न राहता सुलभक, मित्र आणि मार्गदर्शकाची झालेली आहे असे श्री तोष्णीवाल यांनी सांगितले. सौ. वैशालीताई आंबेगावकर यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांच्या कार्याचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले आपली शाळा ही केवळ जिल्ह्याला मार्गदर्शन करणारी शाळा नसून संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारी आणि सर्वाधिक पटसंख्या असलेली एकमेव शाळा असल्याचे त्यांनी सांगितले. येथे चालत असलेल्या विविध स्पर्धा परीक्षा बद्दल आणि पाठ्यपुस्तकांबरोबरच सहशालेय उपक्रमांविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. शाळेने सुरू केलेल्या बाल वाटिका वर्गांबद्दल सौ राणीताई गोलाईत आणि बालवाडी ताईंचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांना AI ( ए आय ) डिजिटल शिक्षण प्रणाली कोर्स पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. श्री सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. श्री. सोनय्या कीर्तनकार यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री रामभाऊ गोलाईत, श्रीराम पकवाने यांच्या सह सर्व शिक्षक वृंद पालक आणि दोन्ही सत्रातील विद्यार्थी उपस्थित होते.






















