दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
येत्या ३० ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकरी व युवा संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी विधान परिषद आमदार सईद खान व खासदार संजय जाधव यांनी सोनपेठ, पाथरी व मानवत येथे भेट देत पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी तसेच युवकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.शेतकरी व युवा संवाद दौरा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच दौऱ्याच्या नियोजनासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.या मानवत तालुक्यातील बैठकीस विशाल यादव, कृष्णा शिंदे, गोविंद नाईक, यांच्यासह तालुका पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. आगामी संवाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोनपेठ, पाथरी व मानवत तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक तयारी वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.





















