दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
ग्राहकांच्या अधिकाराचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली असून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉ विलास मोरे यांची तर मानवतचे तालुकाध्यक्ष डॉ सचिन चिद्रवार यांची या समितीत अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी गुरुवारी ता 10 शासनाने विहित केलेल्या निकषांच्या आधारे पात्र अर्जदाराची निवड करून जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील एकूण 24 अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी असणार असून प्रत्येक महिन्याला घेण्यात येणाऱ्या बैठकीत ग्राहकांचे प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत. सदरील समितीत ग्राहक संघटना प्रतिनिधी म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे प्रांताध्यक्ष डॉ विलास मोरे सेलू, मधुकर मुळे पूर्णा, अब्दुल रहीम अब्दुल करीम परभणी, गंगाधर कान्हेकर सेलू, श्याम रणेर रामपुरी खुर्द तालुका पाथरी, गुलाबराव शिंदे जिंतूर, मंचक जगताप जिंतूर, सोपान टोले गंगाखेड, भगवान करंजे पेठशिवणी, प्रतिभा वाघमारे गंगाखेड यांची तर शेतकरी प्रतिनिधी म्हणून गोपाल कच्छवे दैठना, गंगाधर देशमुख बोरी, वैद्यकीय व्यवसाय प्रतिनिधी म्हणून डॉ संदीप चव्हाण परभणी, डॉ सचिन चिद्रवार मानवत, शाळा व महाविद्यालय प्रतिनिधी म्हणून प्रा संगीता आवचार परभणी, व्यापार व उद्योग प्रतिनिधी प्रवर्गातून जनार्धन आवरगंड ताडकळस, पेट्रोल व गॅस विक्रेता प्रवर्गातून रमेश गीते जिंतूर, जिल्हा परिषद सदस्यामधून परमेश्वर निर्वळ कोल्हा व करुणा कुंडगीर गुंजगाव यांची, पंचायत समिती सदस्या मधून दिलीप काळदाते ब्राह्मणगाव, विलास गिरी पूर्णा, नपा व महापालिका सदस्यांमधून अश्विनी जाधव व रुकसाना बेगम जागीरदार परभणी, बाजार समिती सदस्यांमधून रमेश देशमुख नागापूर यांची नियुक्ती करण्यात आली असून सदरील समितीचा कार्यकाळ तीन वर्षे राहणार आहे.























