दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत तालुक्यातील मौ. वझूर खु. येथे आज दि. १५ सप्टेंबर रोजी गणरायाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना मोठ्या भक्ति भावात आणि जल्लोषात करण्यात आली. सकाळ पासूनच गावात गणेश आगमनाची लगबग दिसून येत होती. मंडळाच्या तरुण कार्यक र्त्यांनी आकर्षक आणि देखणी गणेश मूर्ती आणून विधिवत पूजा – अर्चा करून स्थापना केली. यावेळी ढोल – ताशांच्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मूर्तीची मनमोहक सजावट आणि मंडपाची आकर्षक रचना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशोत्स वाच्या १० दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. बाप्पा च्या आगमनाने वझूर खु. गावात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.























