दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत तालुक्यातील कोथाळा येथील ग्रामस्थांनी शासनाचा कोणताही निधी न घेता, केवळ लोकवर्गणीतून स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. मानवत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा कोथाळा ग्रामपंचायतचे प्रशासक मा. श्री. कृष्णा कानडे यांनी आज कोथाळा येथील स्मशानभूमीच्या विकासकामांना सदिच्छा भेट दिली. स्मशानभूमी परिसरात लावलेल्या वृक्षांना जगवण्यासाठी ठिबक सिंचन पाईपलाईनचे खोदकाम युद्धपातळीवर सुरू असून, या कामाची पाहणी करून श्री. कानडे यांनी गावकऱ्यांच्या स्वखर्चातून सुरू असलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी ते म्हणाले शासनाच्या एक रुपयाचीही अपेक्षा न ठेवता कोथाळा गावाने लोकवर्गणीतून स्मशानभूमीचा कायापालट करून दाखवला आहे. हे काम महाराष्ट्रा तील प्रत्येक गावासाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येक गावाने कोथाळाचा आदर्श घ्यावा. कानडे दिलेल्या प्रोत्साहनामुळे गावकऱ्यांचे मनोबल उंचावले असून, स्मशान भूमीसारख्या ठिकाणाला नंदनवन करण्याचा कोथाळेकरांचा संकल्प वाखाणण्याजोगा आहे असे गौरो उदगार कानडे यांनी काढले.























