दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
जानेवारी व फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची ६ महिन्यांसाठी प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सदर आदेशाने नेमणूक केलेल्या प्रशासक व प्रशासकीय समितीचा ६ महिन्यांचा कालावधी दि. ०४.०९.२०२६ रोजी संपुष्टात आला आहे. त्या मुळे सध्या स्थितीत जिल्ह्यामध्ये एकूण ५६३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणूक करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयाचे संदर्भिय क्र. ०८ अन्वये मुदत संपलेल्या ५६३ ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले आहे. सदर आदेशामध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली असल्यामुळे शासनाने प्रदान केलेल्या अधिकारा नुसार जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ५६३ ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी व इतर अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्तीचे सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहेत यात मानवत तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा समावेश असून त्या पुढील प्रमाणे रुढी, वांगी कुंभारी, उक्कलगांव, जंगमवाडी, वझूर खु., गोगलगांव, नरळद, मानवतरोड, टाकळी नि., सावरगाव खु., रामपुरी बु., केकरजवळा, शेवडी ज. भोसा, हत्तलवाडी, कोथाळा, किन्होळा बु., नागरजवळा, खरबा, कोल्हा, पिंपळा, मंगरूळ पा.प., रामेटाकळी, खडकवाडी, पोहंडूळ, हमदापूर, हाटकरवाडी, पार्डी टाकळी, लोहरा, थार, मांडेडगांव, पाळोदी, ईटाळी, मंगरूळ बु., सोमठाणा, करंजी, बोंदरवाडी, ताडबोरगांव, सावंगी मगर, सावळी, सारंगापूर अशा आहेत. संबंधित प्रशासकांना सर्व अधिकार देण्यात आले असून कुठल्याही प्रकारची खर्चाची मर्यादा घालण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रलंबित व नव्याने सुरू होणाऱ्या विकास कामांना वेग येणार असल्याचे मानवत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.























