दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
सौ. रामकवर द्वारकादास विद्यालय मानवत येथील जागतिक ओझोन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पर्यावरण रक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्या साठी शाळेने हा दिन विशेष रीतीने साजरा केला. यावेळी श्री. ज्ञानेश्वर पांचाळ विद्यार्थ्यांना ओझोन थराचे महत्त्व सोप्या आणि प्रभावी भाषेत समजावून सांगितले ओझोन थर कसा सजीव सृष्टीचे रक्षण करतो आणि त्याच्या ऱ्हासा मुळे निर्माण होणारे गंभीर धोके याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शना मुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक तीव्रतेने झाली. कार्यक्रमाची चमक वाढविण्या साठी विद्यार्थ्यांनी आकर्षक भित्ती पत्रके तयार केली इयत्ता आठवीची वेदश्री यादव, नववीच्या वैष्णवी कोकर, राजेश्वरी कचवे, शांभवी गिराम, अक्षरा वाघमारे तसेच दहावीच्या धनश्री चोबे आणि प्रतीक्षा चौकट या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या भित्तीपत्रकांनी शाळेचे वातावरण रंगतदार केले. या भित्तीपत्रकांद्वारे ओझोन थर वाचविण्याचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. या भित्तीपत्रकाचे विमोचन विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वभूषण इंगोले पर्यवेक्षक विलास शिंदे विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाने या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पर्यावरण जागृतीचा हा उपक्रम शाळेसाठी प्रेरणादायी ठरला.























