दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाबत जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश काढले आहेत. या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाथरी येथे होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाचे ध्वजारोहण मानवतचे तहसीलदार मा. पांडुरंग माचेवाड यांच्या हस्ते होणार आहे. तर मानवत तहसील कार्यालयात होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभात नायब तहसीलदार मा. संजय खिल्लारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामा च्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला होता. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने शासकीय कार्यालयांवर ध्वजारोहण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.























