दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मराठवाड्याच्या स्वाभिमानाचा आणि शौर्याचा प्रतीक असलेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज १७ सप्टेंबर रोजी मौजे नरळद ग्रामपंचायतमध्ये मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुष व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रंजित भैया तुपसमुंद्रे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण होताच उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हणून देशभक्तीचा जयघोष केला यावेळी या कार्यक्रमास गावचे माजी सरपंच तथा जेष्ठ नेते माऊली भैय्या फंड, ग्रामसेवक श्री. मोरे ग्रामपंचायत सदस्य गोविंद चोरमले, सुभाषराव देशमुख यांच्या सह ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा हा निजामाच्या २०० वर्षांच्या जुलमी राजवटी तून मुक्त झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सह अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी हा दिवस संपूर्ण मराठवा ड्यात अभिमानाने साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व ज्ञात – अज्ञात हुतात्म्यांना व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.























