दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या ४९ व्या स्मृति दिना निमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मानवतच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १७ सप्टेंबर गुरुवार रोजी मानवत येथील नालंदा बुद्ध विहार येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भैया साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष नामदेव सहादू आठवणे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय शिक्षक व जिल्हा सरचिटणीस के. वाय. दवंडे, तालुका सरचिटणीस नाथा भदर्गे, तालुका संस्कार उपाध्यक्ष राजेभाऊ गायकवाड, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष नारायण लांडगे, संस्कार सचिव सुभाष लाटे, संरक्षण सचिव सुनील ढगे, कार्यालयीन सचिव भीमा कसारे हे उपस्थित होते. तसेच तालुका संघटक सिताराम अंभोरे, रानोबा कांबळे, ज्ञानोबा वाघमारे, हरिभाऊ घनसावंत, साधू खरात, माजी तालुकाध्यक्ष के. एल. अंभोरे, माजी शहर संस्कार सचिव विलास तुपसमुंद्रे, माजी शहर कोषाध्यक्ष अशोक लाटे यांच्या सह ग्रामीण शाखेच्या पदाधिकारी व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ग्रामीण शाखा वझूर (बु) अध्यक्षा सुधामती वाघमारे, मानोली शाखेच्या मीना भाले, पोहंडूळ शाखाध्यक्ष पांडुरंग शेजावळे, सरचिटणीस उत्तम जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपासिका उपस्थित होत्या. शेवटी श्रद्धांजली व त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.























