दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
श्री संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती निमित्त परभणी येथे भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २० सप्टेंबर रविवार रोजी सकाळी ठीक १० वाजता गुरु रविदास महाराज भवन तथा प्रबोधन केंद्राच्या नियोजित जागेवर, एम आय डी सी परिसर पब्लिक स्कूल समोर परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे. संत रविदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामकिशन कांबळे व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली हा मेळावा होणार असून, या मध्ये चर्मकार समाजातील सर्व पोटजाती ( ढोर, मोची, होलार ) समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन व प्रमुख वक्ते व प्रवचनकार म्हणून गुरु रविदास महाराज वाणीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. अमोल वाघमारे महाराज (तिसरे धाम, कात्रज, पुणे) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तर प्रमुख उपस्थित व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भा. ज. पा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा सौ. प्रभावती अन्नपूर्वे व बारा बलुतेदार सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भालचंद्र गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी, उद्योजक, गटई कामगार, शेतकरी बांधव तसेच गुरु रविदास प्रतिष्ठान व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे आजी – माजी सर्व पदाधिकारी, समाज बांधव व माता – भगिनींनी हजारों च्या संख्येने उपस्थित राहून कार्य क्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महा संघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांनी केले आहे.























