दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
सावळी येथील शिव गणेश मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्स वात बाबा काळे यांनी प्रबोधनकार महाराजांची प्रभावी वेशभूषा सादर केली. सार्वजनिक गणेश मंडपात बाबा काळे यांनी पांढरे धोतर, झब्बा आणि लाल फेटा परिधान करून प्रबोधनकार महाराजांची हुबेहूब वेशभूषा सादर केली. माईकवरून त्यांनी प्रबोधन सादर करताच उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले व संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. दर वर्षी प्रमाणे यंदा ही सार्वजनिक शिव गणेश मित्र मंडळ सावळीने प्रबोधनात्मक कार्यक्रमातून समाजप्रबोधनाचा संदेश दिला असून बाबा काळे यांच्या वेशभूषेचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.























