दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे शेतातील पिके वाळून गेली असून शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २१ सप्टेंबर सोमवार रोजी मानवत येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरातील महाराणा प्रताप चौकात संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या आंदोलना मुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनकर्त्यानी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना मागण्यांचे निवेदन सादर केले दरम्यान आंदोलनात विविध मागण्या करण्यात आल्या यात प्रामुख्याने पावसाने खंड दिल्याने उभे पिके वाळून गेली आहेत. तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाखाची सरसकट मदत द्यावी, हळद या पिकाचा विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, मागील हंगामातील 300 रुपयांचा उसाचा हप्ता साखर कारखान्यांनी द्यावा, जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी कालव्यातून तात्काळ पाणी सोडावे, सर्व शासकीय व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे या सह विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडत भाजी – भाकरी खाऊन नांदेड येथे झालेल्या दुष्काळ बैठकीत मंत्र्यांनी काजू – बदामावर ताव मारल्याच्या पार्श्व भूमीवर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल चौखट, रामप्रसाद गमे, पक्ष तालुकाध्यक्ष नामदेव काळे, युवा तालुकाध्यक्ष दत्ता परांडे, रणजीत चव्हाण, उत्तम गोरे, किशन शिंदे, पी. टी. निर्वळ, मुंजाभाऊ लोंढे, गोविंद घांडगे, शिवाजी चौखट, लक्ष्मण शिंदे, आत्माराम चौखट, उत्तम जोगदंड, विलास जोगदंड व माऊली शिंदे, गोपाळ काळे, उद्धव काळे, महादू काळे, अर्जुन काका काळे, मारोती शिंदे, प्रकाश काळे, कारभारी काळे, सर्जेराव काळे, उत्तम गोरे, यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.























