दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत तालुक्यातील मौ. किन्होळा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड २४ सप्टेंबर रोजी सकाळी शाळेच्या प्रांगणात झालेल्या पालक सभेत पार पडली. अत्यंत पारदर्शक व खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्षपदी गावचे भूषण श्री. मुंजाजी दौलतराव कदम यांची तर उपाध्यक्षपदी श्री. ज्ञानेश्वर विश्वनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात मुंजाभाऊ कदम यांनी शाळेच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. शाळेच्या आवारात होणारे दारू पिणे व इतर गैरप्रकार त्यांनी स्वतः लक्ष घालून बंद केले. तसेच शाळेत स्वच्छता अभियान राबवून कचरा व अस्वच्छता मुक्त शाळा केली असून शाळेला “स्वच्छ व सुंदर शाळा” म्हणून नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत गावकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांचा मुख्य उद्देश पद मिळवणे नसून, केवळ शाळेचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व शासन निर्णयानुसार ही संपूर्ण निवड प्रक्रिया पार पडली. निवड प्रक्रिये बाबतची सविस्तर माहिती श्री. नरेश वाघ यांनी पालकांना दिली, तर श्री. शाम लिपारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी श्रीमती अनिता गिरी व श्रीमती योगिता सोळंके यांनी मोलाचे सहकार्य केले. नवनिर्वाचित समिती सदस्य म्हणून श्री. विनायक कदम, श्रीमती. यमुना कदम, श्री. दिपक कदम, श्रीमती. राधिका कदम, श्री. विकास कदम, श्री. रंगनाथ तुपसमुद्रे, श्रीमती. उषा तुपसमुद्रे, श्री. अशोक बेले, श्रीमती. शामबाला चौधरी यांच्या निवडी करण्यात आल्या. या निवडी प्रसंगी शिवसेना (उ बा ठा) गटाचे सर्कल प्रमुख अर्जुन कदम, दिगंबर कदम, अच्युत कदम, सुभाष कदम, आदेश कदम यांच्या सह सर्व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळे प्रमाणेच गावातूनही व्यसनमुक्ती व्हावी आणि अशा विकासाभिमुख व्यक्तीच्या पाठीशी गावाने खंबीर पणे उभे राहावे अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.























